अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एका वादात अडकले आहेत. ट्रम्प यांचे एका पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची बाब समोर आली आहे. या संबंधांची वाच्यता करू नये, यासाठी पॉर्न स्टारला लाखो रुपये दिल्याचा दावा अमेरिकेतील एका आघाडीच्या दैनिकाने केला आहे. २००६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि स्टेफनी क्लिफोर्ड यांची एका गोल्फ सामन्याच्या वेळी भेट झाली होती. स्टॉर्मी डॅनियल्स नावाने ती अडल्ड सिनेमे करते. यानंतर दोघे कथितरीत्या रिलेशनशिपमध्ये होते. शांत राहण्यासाठी क्लिफोर्डला सुमारे ८३ लाख रुपये देण्यात आले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews